Ad will apear here
Next
कवितेवर ज्यांचं प्रेम नाही, तो कसलाच कलावंत होऊ शकणार नाही : पु. ल. देशपांडे
बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे यांचा १२ जून हा स्मृतिदिन. मॅजेस्टिक बुक स्टॉलतर्फे प्रकाशित झालेल्या ‘पु. ल. : एक साठवण’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ १८ नोव्हेंबर १९७९ रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला होता. त्या समारंभात ‘पुलं’नी केलेल्या भाषणातील काही अंश ‘पुलं’च्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाशित करत आहोत. 
...........
माझ्या साहित्याबद्दल सांगताना कविवर्य बोरकर, मं. वि. राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत या तिघांनी सांगितलं, की मला कवितेचं प्रेम आहे. माझं म्हणणंच असं आहे, की कवितेवर ज्यांचं प्रेम नाही, तो कसलाच कलावंत होऊ शकणार नाही - विनोदी तर नाहीच नाही. जो चांगला वाचक आहे, तो मनातून कवितेचा वाचक असतो. एखादी गोष्ट काव्यमय आहे असं आपण म्हणतो, त्या वेळी त्याचं यमक-प्रास-वृत्त काहीही आपण पाहत नसतो. एखाद्याचं वागणं काव्यमय आहे, असं आपण म्हणतो - एखाद्याचं दिसणं किंवा एखादीचं दिसणं काव्यमय आहे असं आपण म्हणतो - वयाबरोबर आता ‘एखादी’चं वगैरे म्हटल्यावर लोक काय म्हणतील अशी मला भीती वाटायला लागली आहे!

काव्याशिवाय आपण राहू शकत नाही याचं कारणच असं आहे, की अन्न आपल्याला जगवतं आणि काव्य आपल्याला जगायला कारण देतं. कशासाठी जगायचं? जगायचं याच्यासाठीच, की जिथे माणसामाणसांतला प्रास जुळला आहे, माणसामाणसांतलं वृत्त जुळलं आहे - ह्याच्यासाठीच तर जगायचं! म्हणूनच ‘आधी वंदू कवीश्वर। जे शब्दसृष्टीचे ईश्वर’ असं म्हटलं आहे. आता ते आपल्यालाच म्हटलेलं आहे असं काही लोक समजतात, तो भाग निराळा! हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु कवीला उगीच वंदन केलेलं नाही. गणपतीला ‘कविः कविनाम्’ म्हटलेलं आहे. ‘कवी’ ही माणसाला मिळालेली सर्वश्रेष्ठ पदवी आहे. काव्याचं आणि विनोदाचं जमत नसतं असं नाही. विनोदी लेखकाला बेसूर जास्त जाणवतो. त्यामुळे तो सुरांच्या मागे जास्त जातो. त्याला जीवनाचा बेतालपणा जास्त जाणवतो. म्हणून जीवन तालात येण्यासाठी त्यातला बेतालपणा काय आहे, हे तो लोकांना दाखवतो. राजकारणातली माणसं नीट वागत असती, तर आम्ही कशाला लिहिलं असतं? आता तर त्यांनी आमच्याशी चांगलीच स्पर्धा सुरू केली आहे यात शंकाच नाही. रोज त्यांचे विनोदी कार्यक्रम पाहिल्यावर आता आमचं कसं होणार, अशी भीतीही आमच्या मनात उत्पन्न झाली आहे; पण तो भाग निराळा! आजच्या ह्या चांगल्या प्रसंगी उगाच भलती नावं तोंडून निघून जायची.  
....
(पु. ल. देशपांडे याची भाषणे आणि मुलाखती यांचा संग्रह परचुरे प्रकाशन मंदिराने ‘पाचामुखी’ या नावाने प्रकाशित केला आहे. त्या पुस्तकातून हा अंश घेतला आहे. हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

(पु. ल. देशपांडे यांचे आणि त्यांच्याबद्दलचे बाइट्स ऑफ इंडियावरील साहित्य वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)






 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QYZSCN
Similar Posts
रवींद्रनाथ टागोरांच्या नोबेलला १०७ वर्षे बंगाली साहित्य आणि संगीत आणि एकंदरीतच भारतीय कलांना नवा आकार देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांच्या ‘गीतांजली’ या रचनेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्याच्या घटनेला १० डिसेंबर २०२० रोजी १०७ वर्षे पूर्ण झाली. १० डिसेंबर १९१३ रोजी त्यांना हे पारितोषिक देण्यात आले होते. नोबेल
‘पुलं’च्या स्मृतिदिनानिमित्त गप्पा-आठवणी-गाण्यांची ऑनलाइन मैफल (व्हिडिओ) पुणे : पुण्यभूषण पुरस्कारासाठी सात-आठ नावे भाईंनी सुचवली होती... ‘‘पुलं’मुळेच माझे वक्तृत्व बहरले,’ असे तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांनी सांगितले होते... ‘‘पुलं’ची ओळख मी करून देणार,’ असं सांगण्यासाठी कवयित्री शांताबाई शेळके यांनी निनावी फोन केला होता.... पु. ल. देशपांडे यांच्या अशा अनेक आठवणींना
‘पुलसुनीत’ ठरणार दातृत्वामधील दुवा रत्नागिरी : पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्याला माहिती आहेत. लेखनासह विविध कलांच्या त्यांनी केलेल्या आविष्काराचा आनंद आपण कोणत्या ना कोणत्या रूपात लुटत असतो. त्या पलीकडेही दातृत्व हा त्यांच्या जीवनाचा एक मोठा पैलू होता. समाजात तो पैलू वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्ताने
... आणि गुगलवर झळकलं ‘पुलं’चं डूडल! पु. ल. देशपांडे... सकल मराठी जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारं नाव... आज, अर्थात आठ नोव्हेंबर २०२० रोजी ‘पुलं’ची १०१वी जयंती आहे. त्या निमित्ताने गुगलने ‘पुलं’वर डूडल करून महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. मुंबईतले चित्रकार समीर कुलावूर यांनी हे डूडल साकारलं आहे. गुगलचं हे डूडल भारतात सर्वत्र दिसणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language